घरमहाराष्ट्रमला सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

मला सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

Subscribe

खासदार प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज होऊन राजीनामे दिलेल्या समर्थकांशी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत संवाद साधला. यावेळी मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे कडाडल्या. कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे भाजपासह सगळ्याचंच लक्ष लागलं होतं.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीत नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, अशा शब्दांत पंकजा मुंडे कडाडल्या.

- Advertisement -

भागवत कराड यांच्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय ६५ आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


हेही वाचा – मला दबावतंत्र वापरायचं नाहीय; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे केले नामंजूर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -