घर महाराष्ट्र 'भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान'; पंकजा मुंडेंचा दावा

‘भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान’; पंकजा मुंडेंचा दावा

Subscribe

मी मंत्री झाले, त्यानंतर पाच वर्षे स्वत:चा चहा, स्वत:चे पोहे लोकांना देऊन विकासाचा निधी, ग्रामसभेत योजना, पाणीपुरवठा योजना, बदल्याही ऑनलाइन करत असताना शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्या. भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानंतरही अनेकांनी आरोप केले. तसंच, भाजप आणि युतीला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आजपासून शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात केली. वेरुळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन त्यांन या परिक्रमेला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे, तरीही तुम्ही येता, असं म्हणत उपस्थितांचे आभार मानले. यावेळी त्यांनी राजकारणात कसा प्रवेश केला याबाबतही त्यांनी सांगितलं. सोबतच भाजप आणि युतीला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान आहे, असा दावा त्यांनी केला आहे. (BJP leader Pankaja Munde claim that 2019 election 25 MLA Elected i contribute in it )

…म्हणून मी राजकारणात आले

मुंडे म्हणाल्या मला जीवनात काही कमी नव्हतं. खूप छान आयुष्य होतं. बाबांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला. ऊन लागायचं नाही चेहऱ्याला, पायाला माती लागायची नाही. मस्त एशोआरामात जीवन होतं. मग, बापाच्या चेहऱ्यावर दु:ख दिसलं. मला माझा पाच वर्षांचा मुलगा म्हणाला, मम्मी बाबा एकटे पडले, तू बाबांसाठी जा. मी शाळा करतो, मी माझं करो, तू जा. अस तो म्हणाल्यावर मी घराबाहेर पडले. तेव्हापासून आजपर्यंत घराच्या बाहेरच आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

मुंडे साहेब संकटात सापडल्यानंतर त्यांची कन्या असून त्यांची माय झाले. मी मंत्री झाले, त्यानंतर पाच वर्षे स्वत:चा चहा, स्वत:चे पोहे लोकांना देऊन विकासाचा निधी, ग्रामसभेत योजना, पाणीपुरवठा योजना, बदल्याही ऑनलाइन करत असताना शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्या. भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानंतरही अनेकांनी आरोप केले. तसंच, भाजप आणि युतीला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांच्या वेळेचं राजकारण वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. आता पिढी बदलली. दुसरी-तिसरी पिढी आली. आज सकाळी कोणी एकीकडे, दुपारी दुसरीकडे असतं. डोकं पागल व्हायची वेळ आहे, असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीकाही केली.

- Advertisement -

(हेही वाचा: ‘…तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल’; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका )

जालन्यात घडलेल्या घटनेचं दु:ख

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेनं पाहते. कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दु:ख व्यक्त करावसं वाटतं. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडलं त्याबाबत मी दु:ख व्यक्त केलं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisment -