घरताज्या घडामोडीविरोधी पक्षातील नेते फोडण्यात माझाच हात, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची कबुली

विरोधी पक्षातील नेते फोडण्यात माझाच हात, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची कबुली

Subscribe

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली असता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वीच झाला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गट ९ आणि भाजप ९ असे एकूण १८ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, यामध्ये महिलांसह अनेक शिंदे गट आणि भाजप गटातील नेत्यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अशातच भाजपकडून पाहिलं असता बीडमध्ये सक्षम नेतृत्व असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षातील नेते फोडण्यात त्यांचा हात कसा होता, याबाबत मुंडेंनी कबुली दिली आहे.

बस बाई बस या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?, असा प्रश्न सुबोध भावेने पंकजा मुंडेंना विचारला असता त्या म्हणाल्या की, होय, मी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेबांनी मला सांगितलंय की, कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपात आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं मुंडे म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


२०१९ मध्ये विनायक मेटेंना दिला होता धक्का

- Advertisement -

बीडमधील राजकारण पाहिलं असता पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात पहिल्यापासूनच मतभेद आहेत. २०१९ मध्ये भाजपसोबत विनायक मेटे यांनी युती केल्यानंतरही भाजपसोबत राहणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शिवसंग्राम पक्षाच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी मेंटेची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांचा समावेश होता. त्यावेळी मेटेंना बसलेला हा जबर धक्का मानला जात होता.


हेही वाचा : लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजप-शिंदे गटाला बसणार धक्का!, एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -