घरताज्या घडामोडीभाजप नेत्या पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह, ४ दिवसांपासून होम क्वारंटाईन

भाजप नेत्या पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह, ४ दिवसांपासून होम क्वारंटाईन

Subscribe

२२ एप्रिल रोजी पंकजा मुंडे कोरोना बाधितांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या.

भाजप खासदार पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटवरुन त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून होम क्वारंटाईन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्या सोबत असणाऱ्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे. २२ एप्रिल रोजी पंकजा मुंडे कोरोना बाधितांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले होते. त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे २४ एप्रिल रोजी खासदार पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या उपचार घेत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता.


‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी  आधीच काळजी घेऊन होम क्वारंटाईन केले आहे. बाधितांच्या कुटुंबियांना भेटायला गेले होते. त्यांच्या मी संपर्कात आले. माझ्यासोबत असणाऱ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्या. सर्वांनी काळजी घ्या’, असे ट्विट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

- Advertisement -


काही दिवसांआधी बीडमध्ये एकाच अँम्ब्युलन्समध्ये २२ जणांचे मृतदेह कोंबून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या वेळी पंकजा मुंडे क्वारंटाईन होत्या. मी क्वारंटाईन असल्याने मला ही घटना फार उशिरा कळली,अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली होती. त्यावर त्यांनी प्रचंड संपात व्यक्त केला होता. सरकारी रुग्णालयाच्या कामविषयी त्यांनी सरकारवर प्रचंड टीकाही केली होती.


हेही वाचा – काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती चिंताजनक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -