घरताज्या घडामोडी'बघू नव्या चेहऱ्यांनी पक्षाची किती ताकद वाढ होतेय', मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचा...

‘बघू नव्या चेहऱ्यांनी पक्षाची किती ताकद वाढ होतेय’, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचा टोला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर सर्वत्र खासदार प्रीतम मुंडे यांनी मंत्रीपद दिलं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. याच अनुषंगाने आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर मौन सोडलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सर्व माध्यमांसमोर भारती पवार आणि राज्यातील इतर तीन नेत्यांचे अभिनंदन करते, ज्यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही आहे. ज्यांनी संधी मिळाली आहे, त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी आणि पक्षानी त्यांच्यावर विश्वास टाकालाय. बघू आता त्यांच्यामध्ये आणखी किती ताकद वाढ होते. मी ताकद वाढेल अशी शुभेच्छा देते.’

पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल असं सर्वत्र पसरलं होतं. मला काही जणांनी दिल्ली जाण्याचं तिकिटं देखील पाठवलं होतं. पण मी सगळ्यांशी बोलले. प्रीतम मुंडे मुंबईतच होत्या. तसंच पंकजा मुंडे यांची ट्विट केलं त्यानंतर प्रीतम मुंडे यांचं मंत्रीपद गेलं असं म्हटलं जात होतं, हे सगळं हास्यास्पद आहे. डॉ. कराड यांचा मला फोन आला होता की, पीएमओ ऑफिसमधून फोन आला होता, त्यामुळे मी दिल्ली दाखल झाल्याचे सांगितलं होतं. काही लोकांशी माझे जे संबंध आहेत, जे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण केलेले आहेत. माझं पक्षामध्ये नातं आहे, संबंध नाहीत. संबंध आणि नात्यामध्ये फरक असतो. नातं कधीच तुडत नाही, संबंध कधी कटू होतात, कधी गोड होतात. माझं लोकांशी नातं आहे. त्या नात्याच्या अनुषंगाने लोकं वेळोवेळी रिअॅक्ट होत असतात. ज्या लोकांचं प्रेम आहे, त्या लोकांची अपेक्षा आहे.’

- Advertisement -

प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्यामुळे भाजपने अन्याय केला असं समर्थक म्हणत आहेत त्याबाबत पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, ‘राजकारणात जेव्हा निवडणूका येतात, तेव्हा आपल्याला जनतेची मतं, जनतेच्या कलाची आवश्यकता असते. जनता अनेक वर्ष स्वतःच्या समर्पणातून, स्वतःच्या प्रेमातून थोडं थोडं करून एक नेतृत्वाची उंची तयार करत असते. मुंडे साहेब इतके मोठे आहेत, त्यामुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. असं नाही की फक्त प्रेम, नुसतंच नाव आहे. तर आमची मेहनत आहे, आमचा वारसा आहे, वकृत्व आहे, कर्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे आम्हाला लोकांच्या मनातील भावना बदलण्याचं काम माझं नाही, ते वेळेप्रमाणे होत राहिलं.’

सामनातील आजच्या अग्रलेखाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की..

‘मला वाटतं नाही, मी एवढी खूप मोठी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मला संपवण्याचं काम करतील. त्यांनी लिहिलं ते मी वाचलं नाही. वाचल्यावर मी प्रतिक्रिया देईन. राजकारण मी व्यवसाय म्हणून आले नाही. मी एक व्रत म्हणून आले. माझ्या पित्याच्या मृत्यूनंतर बिखरलेला हा समाज, तो अत्यंत संतप्त होता, त्याच्यामध्ये मनात प्रश्नाचं काहूर होत, त्यांना एक ठिकाणी आणणं, माझ्यासाठी खूप मोठं आवाहनात्मक होत. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यातले ५० ते ४० वर्ष खपवून एक ठिकाणी सर्व व्यवस्थित घडी बसवली होती. त्या घडीला विस्कटू देऊ नये, अशी माझी जबाबदारी होती. ही माझी जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडतेय. मी वंजारी समाजाची आहे, हे मला मान्य नाही. जाती रचना मला मान्य नाही. वंजारी समाजाचा आयुष्यभर अभिमान बाळगणारी मी व्यक्ती आहे. वंजारीसमाजासोबत मी एक राज्याची महिला नेता आहे, मी चांगली वक्ता आहे. माझ्याकडे समाज म्हणून बघनं हे अतिशय चुकीचं आहे. आता वंजारी समाजामधला व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी असणार आहे आणि राहणार आहे. फक्त गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या, त्यापद्धतीने गोष्टी हाताळाव. कोणा गरीबाला वाटू नये, मुंडे साहेबांसारखं हे नाही आहे, एवढी काळजी घेतली पाहिजे. त्यांनी जी संधी मिळाली आहे, त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी आणि पक्षानी त्यांच्यावर विश्वास टाकालाय. बघू आता त्यांच्यामध्ये आणखी किती ताकद वाढ होते. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे फक्त वंजारी समाजाच्या नाही आहेत. इतर लोकं देखील वंजारी समाजाचे आहेत. त्याच्यामुळे आणखीन ताकद वाढल्याचे चित्र दिसले पाहिजे, पुढे भविष्यामध्ये काय होईल त्याच्या अभ्यास आपण करू. ताकद वाढले अशी मी शुभेच्छा देते,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -