Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'पुढे काय करायचं?' पंकजा मुंडेंच्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण

‘पुढे काय करायचं?’ पंकजा मुंडेंच्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण

पंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत?

Related Story

- Advertisement -

रविवारी माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहली आहे. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंकजा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात असून राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या. मात्र बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या जागा कमी पडल्याने भाजपाच्या हातून सत्ता गेली आणि महाविकास आघाडीचे सरकार येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. परळी मतदारसंघ हा हक्काचा आणि स्वतःचे वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघात माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदार संघात पंकजा मुडेंचे बंधू धनंजय मुंडे यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला.

राजकीय भूकंप घडवण्याची पंकजा मुंडेंची तयारी

याच पार्श्वभूमीवर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टद्वारे पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा देखील दूसरीकडे होताना दिसताय.

- Advertisement -

भाजपाला सोडचिठ्ठी देणार?

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा दारून पराभव केला. याचा धक्का बसल्याने पंकजा मुंडेंची आता पुढची रणनीती काय?, यासंबंधी त्या १२ डिसेंबर म्हणजेच वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. राज्यातली सत्ता गमावल्यानंतर, देवेंद्र फडणवीसांवर मुळ कार्यकर्त्यांना वगळून इतर पक्षातील उमेदवारांना जागा दिल्याचा आरोप होताना दिसत आहे. ज्यामुळे पंकजा भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का?? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

भगवानगडावर कोणती भूमिका घेणार?

- Advertisement -

“आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे… आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.”, या पोस्टमधील काही ओळींमुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीच असल्याच्या देखील चर्चा एकीकडे रंगत आहेत. त्यामुळे येत्या १२ तारखेला पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलणार?, कोणती भूमिका घेणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदी

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

  1. बातम्या देताना जरा लक्ष ठेवत जा!मेळावा गोपीनाथ गडावर आहे, भगवान गडावर नाही

Comments are closed.