Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र '...तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल'; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

‘…तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल’; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

Subscribe

मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडलं त्याबाबत मी दु:ख व्यक्त केलं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे आता राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. तर काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक नेत्यांनी जालना येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली आता यावर भाजप नेते पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे. तसंच, राज्य सरकारला मायबापाची भूमिका घेण्याची सल्लाही त्यांनी दिला आहे. (BJP leader Pankaja Munde on Maratha Reservation Jalana)

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेनं पाहते. कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दु:ख व्यक्त करावसं वाटतं. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडलं त्याबाबत मी दु:ख व्यक्त केलं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी. मायबापाची भूमिका ही प्रसंगी हळवी, प्रेमळ आणि कडक अशी असते. अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यावी. सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांच्या मागणीचा विचार करून निष्पक्ष चौकशी करावी, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाविषयी सत्ताधाऱ्यांनी जी समिती नेमली आहे, कागदपत्र तयार केले आहेत. ते न्यायालयात टीकतील अशी भूमिका घ्यावी. ओबीसी आरक्षणाचा विषय आणि मराठा समाजाचा विषय वेगळा आहे. त्यामुळे या दोन्ही वेगळ्या विषयांना एकत्र करण्याची आवश्यकता नाही. तसंच, मराठा समाजाला ओबीसीबाबत अपेक्षाही नाही, असंही मुंडे म्हणाल्या.

(हेही वाचा: ‘वेळकाढूपणा’…, जालना लाठीमार प्रकरणातील भाजपाच्या शिष्टाईवर ठाकरे गटाचे ताशेरे )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -