घरताज्या घडामोडीPANKAJA MUNDE : राजकारणात दगाफटका झाला... असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

PANKAJA MUNDE : राजकारणात दगाफटका झाला… असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

Subscribe

बीड : कोणतीही निवडणूक आली की कायम चर्चेत असलेलं नाव म्हणजे पंकजा मुंडे. निवडणुकीत त्यांना संधी मिळेल की नाही, याचे बरेच तर्कवितर्क सुरू असतात. आता देखील, राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांचा विचार होईल की नाही, यावर चर्चा सुरू आहे. यादरम्यानच पंकजा मुंडे यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.

भाजपकडून सध्या ‘गाव चलो’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने पंकजा मुंडे बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या आहेत, तेव्हा त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली. “मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. या राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला इथे कुंकू लावलं, कडक लक्ष्मीचे रूप दिले, हेच तुमचं प्रेम आहे.

- Advertisement -

‘राजकारणात प्रवेश केला आणि संघर्षाला सुरुवात’

आपल्यासाठी 2014 ची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही. गोपीनाथ मुंडे निवडून आल्यानंतर काही दिवसातच ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि तिथूनच संघर्षाला सुरुवात झाली. वडिलांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे”, असं बाळकडू देखील मुंडे यांनी दिल्याचं त्या म्हणाल्या.

‘हे ठरवायला उशीर…’

पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते. तशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण माझ्यावरील प्रेमापोटी लोकांना मला एखादी उमेदवारी मिळावी, असे वाटते. त्यामुळेच आता राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने माझे नाव चर्चेत आले आहे, असे पंकजा यांनी म्हटले. यावर त्यांना तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल की राज्यसभेत जाणे पसंत कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा यांनी म्हटले की, लोकसभा की राज्यसभेवर जायचं हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. मला कुठे जायला आवडेल, यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचे आहे, हे महत्त्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले, ही फार मोठी गोष्ट आहे”, असं त्या म्हणाल्या.

- Advertisement -

राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा नाही

या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे यांना राज्यसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी “पंकजा मुंडेंशी राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

“कोणतीही निवडणूक आली की…”

“गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझं नाव नव्हतं? विधानसभा, राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. अनेक वर्षांपासून मी पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं. त्यामुळे लोक माझं नाव घेतात. आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही. त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात. त्यावर मी काहीही करू शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -