घरमहाराष्ट्रमला दबावतंत्र वापरायचं नाहीये; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे केले नामंजूर

मला दबावतंत्र वापरायचं नाहीये; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे केले नामंजूर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याने मुंडे भगिनींच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे यांनी वरळी येथील कार्यलयात समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला दबावतंत्र वापरायचं नसून कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केले. यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घेणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे भाजपसह सगळ्याचंच लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांनी दिल्लीवरून मुंबईत परतताच भेटीसाठी दाखल झालेल्या समर्थकाशी संवाद साधला. “माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदारकीसाठी राजकारणात आणलं नाही. तर ज्या लोकांना त्यांना उभं केलं त्यांच्यासाठी मला त्यांनी राजकारणात आणलं. त्यांनी मोठ्या उद्देशाने आणलेलं नाही. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी मी राजकारणात आणलेलं नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

“माझ्या वडिलांचा अंत्यविधी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचा असंतोष तुम्हाला आठवतं असेल. लोकांच्या मनात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल प्रेम आहे. मी संघर्ष यात्रा काढली. मी त्यावेळी केलेलं भाषण तुम्ही ऐकलेलं असेल. त्यावेळी मी म्हणाले होते की, माझं भांडण नियतीशी आहे. मी मुंडे यांची वारस आहे आणि मला पद हवंय असं मी कधी म्हणाले का कधी? मंत्रीपद हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार नाही. जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं. माझ्याकडे शून्य ताकद होती. पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का?” असा सवाल करत मला दबावतंत्र वापरायचं नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याची घोषणा केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -