घरताज्या घडामोडीभाजपा नेते प्रसाद लाड यांचे भारतीय लष्कर ध्वज दिनाचं ट्वीट वादात

भाजपा नेते प्रसाद लाड यांचे भारतीय लष्कर ध्वज दिनाचं ट्वीट वादात

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरील वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपा आमदार प्रसाद लाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज भारतीय लष्कर ध्वज दिन आहे. भारतीय लष्कर ध्वज दिनानिमित्त अनेक राजकीय नेते जवानांना शुभेच्छा देत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरील वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपा आमदार प्रसाद लाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज भारतीय लष्कर ध्वज दिन आहे. भारतीय लष्कर ध्वज दिनानिमित्त अनेक राजकीय नेते जवानांना शुभेच्छा देत आहेत. अशातच भाजपा नेते प्रसाद लाड यांनी ध्वज दिनानिमित्त वीर जवानांना सलाम करतानाच्या ट्वीटमध्ये दिवंगत यशवंत केळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. प्रसाद लाड यांचे हे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. (BJP leader Prasad Lads tweet on Indian Army Flag Day is controversial)

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटरवर काही मिनिटांपूर्वी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दिवंगत यशवंत केळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करणारे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला लाड यांनी “आज भारतीय लष्कर ध्वज दिन! आपल्या देशातील सशस्त्र सैन्याप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. देशाच्या चतु:सिमांच्या‌ रक्षणासाठी समर्पण देणाऱ्या सैन्य दलातील वीर जवानांना सलाम!”, असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटरवर पहिले भारतीय लष्कर ध्वज दिनानिमित्त वीर जवानांना सलाम करणारे पोस्टर शेअर केले. त्यानंतर दिवंगत यशवंत केळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करणारे पोस्टर शेअर केले. परंतु, या दोन्ही पोस्टरला लाड यांनी “आज भारतीय लष्कर ध्वज दिन! आपल्या देशातील सशस्त्र सैन्याप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. देशाच्या चतु:सिमांच्या‌ रक्षणासाठी समर्पण देणाऱ्या सैन्य दलातील वीर जवानांना सलाम!” हेच कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपाचे आमदार प्रसाद लाड स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलताना महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणाले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल. पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांच्या तोंडून कोकण शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या पदाधिकाऱ्याने ‘महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला, असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा – …तर मी दिलगिरी व्यक्त करतो, प्रसाद लाडांकडून माफीनामा नाहीच

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -