घरमहाराष्ट्र...म्हणून शरद पवार यांनी राजीनाम्याचा ड्रामा केला; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

…म्हणून शरद पवार यांनी राजीनाम्याचा ड्रामा केला; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Subscribe

शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचं होतं की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा राष्ट्रवादीत घडल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता नाही. राष्ट्रवादीचे नेते आपसात भांडणात गुंतले आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप जिंकणार आहे. शरद पवार यांनी दिलेला राजीनामा हा पूर्वनियोजित रचलेले नाटक होते, अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचं होतं की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा राष्ट्रवादीत घडल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांची वाताहत सुरु आहे आणि म्हणूनच ते रडत होते, असंही दरेकर यावेळी म्हणाले.( BJP leader Pravin Darekar  criticised NCP President Sharad pawar resignation decision )

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

शरद पवारांना अजित पवार यांना धडा शिकवायचा होता, त्यांना दाखवून द्यायचे होते, त्यांना दाखवून द्यायचं होतं की पक्ष माझाच आहे, म्हणून हा सर्व ड्रामा त्यांनी घडवला. तसचं, दरेकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या शनिवारी झालेल्या सभेवरुन त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना सैनिकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह समर्थ आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते तीच ती कॅसेट लावत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या मांडीला मांडील लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसत आहेत, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी देखील टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते हे आपापसात भांडणार गुंतले आहेत. सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण आता राहिलेला नाही. तसंच, येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप जिंकणार आहे. शरद पवार यांनी दिलेला राजीनामा हा पूर्वनियोजित रचलेलं नाटक होतं, अशी टीका अजयकुमार मिश्रा यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -