घरताज्या घडामोडीतरूणाला पोलिसांनी घेरून अमानुष मारहाण, पोलीस दलाची मान खाली घालणारी घटना -...

तरूणाला पोलिसांनी घेरून अमानुष मारहाण, पोलीस दलाची मान खाली घालणारी घटना – दरेकर

Subscribe

अमानुष मारहाण करणे ही महाराष्ट्राची, महाराष्ट्र पोलीस दलाची संस्कृती नाही.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियिलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची वस्तुस्थिती मांडणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असून कारवाई करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजप कार्यकर्त्याला जालन्यात ७ ते ८ पोलिसांनी घेरून लाठ्याकाठ्यांनी केलेली अमानुष मारहाण ही महाराष्ट्राच्या पोलीस दलाला आणि सरकारला खाली मान घालायला लावणारी घटना असल्याचे म्हणत निषेध केला आहे. जालण्यातील खासगी रुग्णालयात पोलिसांनी तरुणाला घेऊन अमानुष मारहाण केली आहे.

जालन्यातील खासगी रुग्णालयात झालेल्या तोडफोड प्रकरणात जालना पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याला घेऊन काठी तुटेपर्यंत मारहाण केली आहे. ही मारहाण ९ एप्रिलरोजी करण्यात आली होती परंतु आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची राजकीय नेत्यांनी दखल घेत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

- Advertisement -

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय की, धृतराष्ट्र बनून सरकार या घटनेकडे पाहते असे कसे ? भाजप कार्यकर्त्याला जालन्यात ७ ते ८ पोलिसांनी घेरून लाठ्याकाठ्यांनी केलेली अमानुष मारहाण ही महाराष्ट्राच्या पोलीस दलाला आणि सरकारला खाली मान घालायला लावणारी घटना आहे. याचा मी निषेध करतो! असे ट्विट प्रवीण दरेकरांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान दरेकरांनी पुढे म्हटले आहे की, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कारण काहीही असलं तरी राज्यात कायद्याचं अस्तित्व अजून शिल्लक आहे. कायद्यापेक्षा जर कोणी स्वतःला मोठा समजत असेल, मग तो कोणीही असो, शिक्षा झाली पाहिजे. परंतु अशी अमानुष मारहाण करणे ही महाराष्ट्राची, महाराष्ट्र पोलीस दलाची संस्कृती नाही. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आजच्या आज निलंबित करा आणि या घटनेची जिल्ह्याबाहेरील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

काय आहे प्रकरण

भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले आणि इतर कार्यकर्त्यांना जालन्यातील रुग्णालयात जाऊन तोडफोड केली होती. ९ एप्रिलला एका युवकाचा अपघात झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरुन रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे रुग्णालय कोविड सेंटर होते यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तोडफोड करणाऱ्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

जमावाने पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर संतप्त पोलिसांनी युवकांवर लाठीमार केला. यामध्ये भाजप कार्यकर्त्याला पोलिसांच्या हातामधली काठी तुटेपर्यंत मारण्यात आले. ही घटना ९ एप्रिल रोजीची आहे. जवळपास दीड महिन्यानंतर या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधीक्षक एसपी देशमुख यांच्याकडे केली आहे.


हेही वाचा : जालना पोलिस मारहाण प्रकरण, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाई करण्याची केली मागणी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -