घरताज्या घडामोडीगिरे तो भी टांग उपर.., पवारांच्या विधानाचा भाजप नेत्याने घेतला समाचार

गिरे तो भी टांग उपर.., पवारांच्या विधानाचा भाजप नेत्याने घेतला समाचार

Subscribe

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ते आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले होते. यावर भाजप नेत्यांकडून टीकाही करण्यात आल्या. दरम्यान, गिरे तो भी टांग उपर असं म्हणत भाजपच्या नेत्याने अजित पवारांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गिरे तो भी टांग उपर, असं अजित पवारांचे झाले आहे. विधान चुकल्यानंतर आणि विरोध झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहीजे होती. पण अजित पवारांचा अहंकार असा आहे की, तो त्यांच्यामधून जायचा तयार नाही, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी पवारांवर टीका केली.

- Advertisement -

एका बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधानं करायची आणि दुसऱ्या बाजूला स्वत:चे सत्कार समारंभ करायचे. यामुळे राजकारणात नवी विकृती आली आहे की काय, असे वाटायला लागले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, याबाबत विश्वास पाटील यांनी अनेक संदर्भ दिले आहेत. त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. हा मुद्दा इगो किंवा प्रेस्टिजचा न करता भावनिक राजकारण थांबायला हवे. जनतेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

सध्याचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे. शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या क्षमतेने अनेक धाडसी निर्णय घेतले गेले आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत वेगाने निर्णय घेतले आहेत, असंही दरेकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, अजित पवारांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझी प्रत्येक भूमिका सगळ्यांना पटेलच असं नाही आणि माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? असा सवाल अजित पवार यांनी भाजपला विचारला.


हेही वाचा : अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, चित्रा वाघ यांचं चाकणकरांना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -