घरमहाराष्ट्रमाझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई; प्रवीण दरेकरांचा 'मविआ' सरकारवर आरोप

माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई; प्रवीण दरेकरांचा ‘मविआ’ सरकारवर आरोप

Subscribe

मागील तीन-चार तासांपासून प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली पोलिसांची मानसिकता दिसली, तसंच, माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोपही यावेळी प्रवीण दरेकरांनी केला.

मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज सोमवारी पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. मागील तीन-चार तासांपासून प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली पोलिसांची मानसिकता दिसली, तसंच, माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोपही यावेळी प्रवीण दरेकरांनी केला.

“तेच तेच मुद्दे पुन्हा उगाळून माहिती घेण्याचा प्रयत्न होता. एफआयआरशी संबंधीत मुद्दे असायला हवे होते. परंतु, सर्व माहिती व्यक्तीगत माहिती घेतली जात होती. यामध्ये मी कुठे-कुठे नेतृत्व करतो. कुठे-कुठे माझे संबंध आहेत. संस्थांची माहिती घेतली जाच होती. मात्र एपआयआरशी संबंधीत माहिती काहीच घेतली जात नव्हती. अशा पद्धतीनं व्यक्तीकेंद्रीत छळवाद मांडण्याचा दृष्टीनं आणि सरकाच्या दबावाखाली पोलिसांची मानसिकता दिसली.”

- Advertisement -

“मी पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो. आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनीधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखा आक्रस्थाळीपणा करणार नाही. त्यांच्या लोकांना त्याठिकाणी चौकशीसाठी बोलावल्यावर काय नंगानाच करतात हे आपण पाहिलं. परंतु आमच्यावर कार्यकर्ता म्हणून कायद्याचे पालन करण्याचे संस्कार असल्यानं ज्या दिवशी एफआयआर झाला त्यादिवसापासून मी पोलिसांना सहकार्य करत आहे.”

“मागच्या वेळी तीन-चार तास चौकशी झाली. आजही तीन-चार तास चौकशी करण्यात आली. याउपर जेव्हा-जेव्हा त्यांना अवशक्यता आहे. त्यावेळी पोलिसांसमोर चौकशीसाठी उपलब्ध राहीन. तथापी, यांना पोलिस कस्टडी कशासाठी हवी आहे. तर एफआयआर चुकीचा करायचा, छळवाद मांडायचा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत आहेत. यावर आम्ही काउंटर ला रिअॅक्शन देतोय अशाप्रकारची सुडभावनाच यामागे सर्व प्रकारामागे दिसते आहे.”

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपावरही प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. ‘किरीट सोमय्या पळुन जाणारा माणुस नाही, तो इतरांना पळायला लावत असल्याचं महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे. तसंच, सोमय्यांची आता न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यामुळं किरीट सोमय्या हा काही लपणारा आणि पळणारा नेता नाही’, असं त्यांनी म्हटलं.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या फोन टॅपींगच्या मुद्द्यांवरही प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं दररोज नाव घेतलं नाहीतर यांचा दिवस जात नाही. तसंच सकाळी दुपारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करत असतात.


हेही वाचा – ठाण्याच्या सभेला ये, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -