घरताज्या घडामोडीअधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे ठाकरे सरकारमधील विसंवाद कायम असल्याचे स्पष्ट, दरेकरांचा हल्लाबोल

अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे ठाकरे सरकारमधील विसंवाद कायम असल्याचे स्पष्ट, दरेकरांचा हल्लाबोल

Subscribe

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्याच्यावर अवघ्या काही तासात स्थगिती आणल्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्या करताना वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घेतलं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद कायम असल्याचे स्पष्ट झालं असेही दरेकर म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकारमध्ये विसंवाद आणि संभ्रमाची स्थिती असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन राजकारण तापल्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मविआ सरकारमध्ये विसंवाद आजही कायम आहे. जर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसारख्या वरिष्ठ मंत्र्यांची नाराजी असेल तर त्याचा अर्थ गृहखात्याने बदल्या करताना शिवसेनेला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही, हे स्पष्ट होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना आपल्या पक्षाला ज्येष्ठ मंत्र्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये लक्ष नसणार किंवा गृहमंत्री-राष्ट्रवादी त्यांना जुमानत नसणार, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याकडून नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसत आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांना बढती आणि नंतर स्थगिती

मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधीक्षक, पोलिस उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. त्याचे आदेश देखील गृहविभागाकडून काढण्यात आले होते. मात्र, पण, १२ तास उलटत नाहीत तोच या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. पण, आज सकाळी त्यांच्या बढती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या १२ तासांत स्थगिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -