‘हॅलो’ हा शब्द 18 व्या शतकातला; त्याचा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा, सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना टोला

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला.

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यत्तर देत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘हॅलो’ हा शब्द 18 व्या शतकात आला आहे. या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा होता, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे “मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारीपर्यंत आम्ही अभियान करणार आहोत”, असेही त्यांनी म्हटले. (Bjp leader sudhir mungantiwar slams opposition party on vande mataram)

विरोधांच्या विरोधानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी विरोधकांवर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. “वंदे मातरम याचा अर्थच या भूमीला नमन आहे आणि नमन करण्यासाठी कोणी विरोध दर्शवला असेल, तर लोकशाही आहे. त्यांचे मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारीपर्यंत आम्ही अभियान करणार आहोत. या अभियानाच्या माध्यमातून ज्या लोकांना भारत भूमीला वंदन करताना अडचणी निर्माण होतात, त्यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

शिवाय, “हॅलो हा शब्द 18 व्या शतकात आला आहे. या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा होता. 1827 साली हा शब्द आला होता. त्यानंतर सर्वत्र तो उच्चारला गेला. इंग्रजांची आठवण आपण ठेवली. ती आठवण पूसून आपल्या मराठी गीतामध्ये वंदे मातरम् याबाबत सुंदर वर्णन केलेले आहे. त्यामुळे जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद करू आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू की वंदे मातरम् हा शब्द जातीय, धर्मांद, राजकीय शब्द नसून, या देशाचे नमन आहे. या भावनेने आपल्याला याकडे बघायचे आहे”, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले

“मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य मंत्री आहे आणि राज्यात मी हे अभियान राबवणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला आणि शिवसेनेला काय वाटते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही”, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.

दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या घोषणेनंतर विरोधकांनी याला विरोध केला. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी “मी जय महाराष्ट्र म्हणेन”, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, “आम्ही तसे म्हटले नाही, तर तुम्ही जेलमध्ये टाकणार की पोलिसांमार्फत केस करणार, कोणावरही अशी जबरदस्ती करू नका. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी. श्वास कुठून, कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का, असा सवालही त्यांनी केला. भारतीय संस्कारात नमस्कार केला जातो. त्या नमस्कारानेच संस्कृतीची सुरुवात होते. कोणी ‘जय भीम’ बोलतो तर कोणी ‘जय हिंद’ करतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्त्वाच्या आहेत”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांच्या घोषणेचा विरोध केला.

वंदे मातरम् शिवाय दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या, अशा शब्दांत रझा अकादमीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाला आक्षेप घेतला आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी सल्लामसलत करणार असल्याचे म्हटले आहे.

“हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील”, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


हेही वाचा – राज्यात आता ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणत होणार संभाषणाला सुरुवात, मंत्री मुनगंटीवारांची घोषणा