घरताज्या घडामोडीcorona Virus: प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

corona Virus: प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

Subscribe

मुंबई जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीदरम्यान प्रवीण दरेकर यांच्या अनेक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी भेटी झाल्या आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. भाजपच्याही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई बँक निवडणुकीदरम्यान प्रवीण दरेकर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांच्या आणि लोकांच्या संपर्कात आले आहेत. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरेकरांची तब्येत ठिक असून त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

भाजपचे आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी भाजप नेते अतुल भातखळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यासह एकाच दिवशी ५ ते ६ नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदारांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बहुतांश नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. दरेकर म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी” असे आवाहन दरेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

अनेक नेत्यांच्या आले होते संपर्कात

मुंबई जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीदरम्यान प्रवीण दरेकर यांच्या अनेक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी भेटी झाल्या आहेत. दरेकरांची अनेक लोकांनी भेट घेतल्यामुळे चिंता वाढली आहे. अधिवेशनानंतर प्रवीण दरेकरांनी ज्या राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्न कार्यात हजेरी लावली होती. त्यामधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.


हेही वाचा : Corona Virus : राज्यात १०० टक्के लॉकडाऊनची सध्या आवश्यकता नाही, राजेश टोपेंची माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -