मुंबई : विधानसभा मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर विरारमधील एका हॉटेलमध्ये कथितरित्या पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप तावडे यांनी फेटाळले होते. यानंतर, तावडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी आरोप केले. आता या प्रकरणी विनोद तावडे यांनी कॉंग्रेस नेत्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. (bjp leader vinod tawde embroiled in a cash scandal sent a notice to congress leaders rahul gandhi kharge else says apologize)
विनोद तावडे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सुप्रिया श्रीनेत यांना मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याबाबत कॉंग्रेस नेत्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत. माझ्यासारखा सामान्य परिवारातून आलेल्या नेत्याला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा हा कट आहे. माझी बदनामी केल्याप्रकरणी मी या सगळ्या नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी सार्वजनिकरित्या माझी माफी मागितली नाही तर मी कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा तावडे यांनी दिला आहे.
कांग्रेस का एक ही काम है झूठ फैलाना!
नालासोपारा वाले झूठे मामले में मैंने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गाँधी और पार्टी प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत को मानहानि का नोटिस भेजा है, क्योंकि उन्होंने इस मामले में झूठ फैलाकर मेरी और भारतीय जनता पार्टी की छवि को नुकसान… pic.twitter.com/ZO75yKSx8m
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 22, 2024
खोटं पसरवणं हेच कॉंग्रेसचं काम
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस तावडे यांनी कॉंग्रेस नेत्यांना बजावलेल्या नोटिसीच्या प्रती समाज माध्यमांवर शेअर केल्या आहेत. खोटं पसरवणं हेच कॉंग्रेसचं काम आहे. नालासोपाऱ्यातील खोट्या प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि कॉंग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. कारण त्यांनी या प्रकरणी खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. सत्य सर्वांच्या समोर आहे, निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासणीत कथितरित्या वाटण्यात आलेले पाच कोटीची रक्कम सापडली नाही.
नियमांची मला देखील माहिती
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान झाले. त्याच्या एकच दिवस आधी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मतांसाठी कथितरित्या पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी विरारमधील स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना हॉटेलमध्ये पकडले होते. मात्र, तावडे यांनी हे आरोप फेटाळले आणि आपल्याला यासंदर्भातील नियमांची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, राजकीयदृष्ट्या विरोधक असलेल्या पक्षाच्या हॉटेलमध्येच थांबून असे काम मी कसे करेन, अशी विचारणा देखील त्यांनी केली होती.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar