Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पंतप्रधान मोदींनी देशातील २ अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली, भातखळकरांची टीका

पंतप्रधान मोदींनी देशातील २ अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली, भातखळकरांची टीका

बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात - अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. देशात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु आहे. कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडथळा येत आहे. केंद्र सरकारने लसी घेऊन राज्यांना द्यावी अशी मागणी केली जात होती. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी दाखवली असल्याची खोटक टीका केली आहे.

भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मोदींच्या संवादानंतर महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वांचे १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी केंद्र सरकारने ५० टक्के लसीचा साठा ठेऊन थेट कंपन्यांकडून ५० टक्के लसी राज्य सरकार घेऊ शकणार होते. परंतु आता येत्या २१ जूनपासून केंद्र सरकार देशातील सर्वच राज्यांना मोफत लसींचा साठा पुरवणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे मुख्यमंत्री लसींच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकारडे बोट दाखवत होते यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करुन तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली आहे. सोमवारी केलेल्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लसींच्या योजनेची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनात देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. अशी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात आली आहे. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -