मुंबई : साधारणपणे सव्वा वर्षांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या एका नेत्याचा व्हिडीओ ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित भाजपा नेत्याचा एक फोटो ट्वीट केला आहे. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कसिनोत जुगार खेळत आहेत, असे शीर्षक दिले आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे ट्वीट टॅग केले आहे.
हेही वाचा – “ज्यांना मोठे केले तेच आज…”, पुण्यातील सभेतून मनोज जरांगेंनी नेत्यांवर साधला निशाणा
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्यावर्षी जुलै महिन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ पोस्ट केला होता. काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, अशी कॅप्शन चित्रा वाघ यांनी दिले होते. काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपाची रणनीती आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी नाना पटोले यांनी दिली होती.
ते म्हणे..
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
आता खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यातील व्यक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी दिसते. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमध्ये साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्यूत खेळले तर बिघडले कोठे? अशी कॅप्शन, ‘ते तेच आहेत ना?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ते म्हणे कुटुंबीयांसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्यासोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा – संजय राऊतांकडून भाजपाच्या नेत्याचा कथित फोटो ट्वीट; काँग्रेसने सीबीआय चौकशीची केली मागणी
तर, नाना पटोले यांनी याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये संजय राऊत यांना ट्वीट केलेला फोटो भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा दिसत आहे, तो तपासला गेला पाहिजे. हे खरं आहे की नाही, हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे. याप्रकरणी एक चौकशी लावली पाहिजे. गरज पडली तर सीबीआयची चौकशी यामध्ये व्हायला पाहिजे, असे पटोले म्हणाले.