Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मेधा कुलकर्णींवर भाजप नेते संतापले; पक्षाची शिस्त मोडल्याचा केला आरोप

मेधा कुलकर्णींवर भाजप नेते संतापले; पक्षाची शिस्त मोडल्याचा केला आरोप

Subscribe

पक्ष शिस्त सातत्याने मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या संदर्भात भाजप कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी व्हिडिओ प्रसारित केला असून मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

पुणे शहरातील चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर आपली खदखद मांडली होती. त्यानंतर उद्घाटन समारंभात मेधा कुलकर्णी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं. तसंच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता याबाबत भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप कोथरुड मंडळ अध्यक्षांनी मेधा कुलकर्णी यांना सुनावलं आहे.(  BJP leaders angry at Medha Kulkarni Alleged violation of party discipline Punit Joshi Kothrud )

मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त मोडत असल्याची चर्चा कोथरुडमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. भाजप कोथरुड अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ प्रसारित करून मेधा कुलकर्णींचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पश्चिम पुण्याचं प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाचे 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच, अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं. मात्र,या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबूक पोस्ट लिहून चांदणी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून पक्षालाच घेरण्याचा प्रयत्न केला. मेधा कुलकर्णी यांच्या या फेसबूक पोस्टवरून आता कोथरूड भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, पक्ष शिस्त सातत्याने मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या संदर्भात भाजप कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी व्हिडिओ प्रसारित केला असून मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाले पुनीत जोशी ?

- Advertisement -

पुनीत जोशी म्हणाले की, पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी पार पडले. पण या ऐतिहासिक सोहळ्याबाबत माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली. साधे हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता पण त्याच वेळी शहरात 240 होaर्डिंग्स वर यांचे फोटो होते, वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते.

साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षानं आम्हला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी नंतर आपण, हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही व्यक्त होणं एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटलं नाही, असं म्हणत पुनीत यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

मेधा कुलकर्णी नाराज का?

- Advertisement -

पुणे कोथरुडमधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. आपण जुन्या कार्यकर्त्या असताना पुणे शहरातील भाजप नेत्यांकडून डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. परंतु पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

( हेही वाचा: ‘ राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हातात ‘; राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका )

- Advertisment -