Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे कामाच्या ताणातून भाजपा नेत्याच्या मुलीची पुण्यात आत्महत्या

कामाच्या ताणातून भाजपा नेत्याच्या मुलीची पुण्यात आत्महत्या

Subscribe

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गडचिरोलीमधील भाजपा नेत्याची मुलगी सायली बट्टे हिने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सायली बट्टे ही गडचिरोलीमधील भाजपा नेते वासदेव बट्टे आणि नगरसेविका वर्षा बट्टे यांची कन्या आहे.

सायली बट्टे (२४) ही मुळची गडचिरोली झाशीनगर येथे राहणारी आहे. ती गेल्या वर्षभरापासून पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत होती. परंतु, कामाचा ताण वाढल्याने तिला नैराश्य आले. या नैराश्येतून तिने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

सायली तिच्या भावासोबत पुण्यात राहत होती. काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ पुण्याहून गडचिरोलीला परतला. त्यामुळे ती रुममध्ये एकटीच होती. तिने शनिवारी तिच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्कही साधला. मात्र, त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – साताऱ्यात थरार! शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार

- Advertisement -

१५ मार्च रोजीही आयटी क्षेत्रातील एका अभियंताने पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली. पुण्यातील औंध परिसरातील एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे ३ मृतदेह सापडले होते. आयटी अभियंता असलेल्या ४४ वर्षीय तरुणाने बायको आणि आठ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर पॉलिथीन बॅग बांधून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेत जीवन संपवले होते.

हेही वाचा – पुणे हादरलं : पत्नी आणि मुलाची हत्या करून आयटी अभियंताची आत्महत्या

- Advertisment -