पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; काँग्रेस माजी शहराध्यक्ष शेख हुसेनांविरोधात तक्रार दाखल

विशेष म्हणजे शेख हुसेन बोलत असताना व्यासपीठावर उर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार अॅड. अभिजित वंजारी असे अनेक नेते उपस्थित होते.

bjp lodges police complaint against former congress city president sheikh hussain in nagpur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूरमधील काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेख हुसेन असे या शहराध्यक्षाचे नाव आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. काल रात्री हुसेन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि ५०४ आयपीसी (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. याच निषेधार्ह सोमवारी नागपुरातील ईडी कार्यालयाबाहेर विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी धरणे धरले. तसेच काँग्रेसने याचा कारवाईवरून केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान एका सभेत बोलताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

विशेष म्हणजे शेख हुसेन बोलत असताना व्यासपीठावर उर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार अॅड. अभिजित वंजारी असे अनेक नेते उपस्थित होते. मात्र यापैकी एकानेही हुसेन यांना बोलण्यापासून कोणीचं रोखले नाही. शेख हुसेन यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला. हुसेन यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले. यानंतर आता हुसेन यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांनी केली आहे.

शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेले विधान अतिशय निंदणीय आणि खालत्या स्तराचे असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत हुसेन यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला नाही तर पोलिस ठाण्यात रस्त्यावर उतरू ठिय्या आंदोलन करणार असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.


बृजभूषण सिंह शहाणे राजकारणी, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत – संजय राऊत