घरताज्या घडामोडीदिल्लीत फडणवीस-शेलार-पाटील, अमित शहांसोबत कोणती खलबत

दिल्लीत फडणवीस-शेलार-पाटील, अमित शहांसोबत कोणती खलबत

Subscribe

भाजपच्या नेत्यांच्या स्वतंत्रपणे अमित शहा यांच्या बैठकांमुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळून टाकण्याची शेवटची रणनीती झाली आहे का असा सवाल आता अनेक जण करत आहेत.

मुंबईत शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत होते त्याचवेळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला भाजपचे आमदार आशिष शेलार पोहचले त्यानंतर तातडीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही स्वतंत्रपणे दिल्लीत अमित शहा यांना भेटले. तर शनिवार पासून भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असून ते ही अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यामुळे भाजपचे तीन वरिष्ठ नेते स्वतंत्रपणे दिल्लीत भेटण्यामागे कोणती खलबते सुरू आहेत असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. (Devendra Fadnavis Ashish Shelar Chandrakant Patil met Amit Shah in Delhi)

कधी मध्यावर्ती निवडणूका, कधी शिवसेनेचे भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न, कधी राष्ट्रवादीच्या एका गटाची हात मिळवणी करण्याचे डावपेच तर कधी राष्ट्रपती राजवटीची आखणी अशा अनेक फ्रंटवर भाजप आणि भाजचे चाणक्य काम करीत असल्याने अचानक फडणवीस यांच्या बरोबर आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनाही दिल्लीला बोलावून घेतल्याने गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात चालले तरी काय असा प्रश्न दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांना पडला आहे. देवेद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. आशिष शेलार हे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच अमित शहा यांच्याही गुड बुकात आहेत. तर चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचे निटकवर्तीय असल्याने त्यांच्या राज्यातील भाजपवर बऱ्यापैकी पगडा आहे. मागील महिन्याभरात देवेंद्र फडणवीस यांनी किमान चार वेळा दिल्लीत मोदी आणि शहा यांच्या भेटी घेतल्या. तर आशिष शेलार यांनी दोन वेळा दिल्ली वारी केलेली आहे. चंद्रकांत पाटील शनिवार पासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते ही अमित शहा यांना भेटतील असे समजते.

- Advertisement -

एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी स्थिरस्थावर होत असताना भाजपच्या नेत्यांच्या स्वतंत्रपणे अमित शहा यांच्या बैठकांमुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळून टाकण्याची शेवटची रणनीती झाली आहे का असा सवाल आता अनेक जण करत आहेत. एकीकडे शरद पवार यांनी राज्यातील विषय घेऊन स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होते आणि काही तासातच दिल्लीत आशिष शेलार आणि फडणवीस यांनी दिल्लीत स्वतंत्रपणे भेट घेतात. या भेटीगाठीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांपैकी एका पक्षाला आपल्या सोबत घेण्याचे भाजपचे डावपेच आहेत मात्र मागील पावणेदोन वर्षात भाजपचे अनेक प्रयत्न सत्ता बदलण्यासाठी जळून आले नाहीत आणि त्यांना १४५ आमदारांचा आकडाही जमावता आला नाही त्यामुळे भाजपकडून सत्ता बदलण्याच्या नवीन नवीन डेडलाईन यापूर्वी देण्यात आल्या मात्र राज्यातील १५ महापालिकेंच्या निवडणूकांपूर्वी सत्ताबदल करण्यासाठी भाजपचे चाणक्य कामाला लागले आहे असे या भेटीगाठीवरुन दिसते.


हेही वाचा – कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -