परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीनेच घ्या, ‘अन्यथा रस्त्यावर उतरू आणि…’; ‘भाजयुमो’चा इशारा

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना (Students) ऑनलाईन शिक्षण (Online Study) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या.

state government big decision 10th and 12th students who lost parents due to corona
Corona: कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना (Students) ऑनलाईन शिक्षण (Online Study) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यातील काही विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने डिसक्रीप्टिव्ह स्वरुपात घेण्यात येणार आहेत. मात्र, या ऑफलाईन परीक्षांना भाजपाकडून विरोध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन परीक्ष ऑफलाईन MCQ पद्धतीने घ्याव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उचरेल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

‘भाजयुमो’च्या पत्रात काय लिहिले?

भारतीय जनता युवा मोर्चाचे (Bhartiya Janata Yuva Morcha) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना पक्ष दिले आहे. या पत्रात त्यांनी “महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध विद्यापीठांमध्ये शिकणारे तमाम विद्यार्थी त्यांच्या परीक्षांच्या बाबतीत चिंतीत आहेत विद्यार्थ्याच्या परीक्षांच्या बाबतीत राज्य सरकारची व शिक्षणमंत्री म्हणून खासकरून आपली भूमिका अतिशय उदासीन आहे. विद्यार्थी वारंवार परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी करीत असताना आपण मात्र या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत हा विषय कुलगुरूंकडे टोलवत असल्याची टीका विद्यार्थी बांधव करीत आहेत.

हेही वाचा – Covid Maharashtra: शिक्षण विभाग शाळांकरिता नवी कोविड नियमावली जारी करणार

कोरोना काळात आपण ‘डिवायस्टर अॅक्टचा वापर करीत तुमचा निर्णय सर्व विद्यापीठांवर लादतात. सध्याची स्थिती ही त्याच कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर उदलेली परिस्थिती असल्याने व अजूनही शैक्षणिक यंत्रणांची गाडी व्यवस्थित रुळावर आली नसल्याने आपण पूर्वी प्रमाणे यावेळीही स्वतःचा अधिकार वापरून सर्व परीक्षा समान पद्धतीने होण्याचे निर्देश देणे अपेक्षित आहे. जर प्रत्येक विद्यापीठ परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ लागते तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तुलना आपण कशी काय करणार? आपल्या राज्याचे विद्यार्थी जर इतर राज्यांच्या तुलनेत मागे राहीले तर या पापाची जबाबदारी तुम्ही घेणार का ?

नागपूर, जळगाव, गोंडवाना विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेत आहे आणि पुणे, अमरावती व इतर विद्यापीठे परीक्षा संपूर्ण ऑफलाईन (डिसक्रीप्टिव्ह) पद्धतीने घेत आहेत. शिक्षणमंत्री म्हणून आपले या विषयावर कंट्रोल का नाही? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला गेला आहे, काही ठिकाणी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण ही झाला नाही आपण विद्यार्थ्यांना “क्वेशन बँक” देण्याची घोषणा केलीत परंतु प्रत्यक्षात मात्र तसे घडलेच नाही अशी स्थिती सर्वदूर महाराष्ट्रात असल्याने केवळ या वेळेला परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत व भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने विद्यार्थ्यासोबत हा लढा लवत आहे. आपण व आपल्या सरकारने झोपेचे घेतलेले हे सोंग त्वरित सोडावे व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अथवा विद्यार्थी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत तसेच लाखो विद्यार्थ्यांचा रोष आपल्या प्रती व्यक्त होत राहील. आपण या विषयावर त्वरित सकारात्मक निर्णय करावा अथवा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून संघर्ष करेल व जबाबदारी पूर्णतः सरकारची राहील.”, असे या पत्रात लिहिण्यात आले आहे.


हेही वाचा – गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन संशयित शूटर पुण्याचे; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी