राज्यसभा निवडणुकीची घोषणा, भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी मिळण्याची शक्यता

BJP likely to get a chance Vinod Tawde and Vijaya Rahatkar for Rajya Sabha election
राज्यसभा निवडणुकीची घोषणा, भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी मिळण्याची शक्यता

देशातील राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील ६ राज्यसभेच्या जागांवर निवडणुका जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १० जूनला राज्यसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांना संधी देण्यात येणार आहे. तर भाजपकडून विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. देशातील १५ राज्यामध्ये ५७ जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. तर भाजपच्या तीन खासदारांचा कार्यकाळ ३ मे रोजी संपुष्टात आला आहे. याच जागांवर आता निवडणूक जाहीर करण्यात आले.

राज्यातील ६ राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु एका जागेवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महतमे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत.

दरम्यान यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांना राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात येऊ शकते. परंतु भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत अधिसूचना २४ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असेल. १ जूनला अर्जांची छाननी केली जाईल आणि अर्ज मागे घेण्यासाठी ३ जूनपर्यंत वेळ असेल. ५७ जागांवर १० जून रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान होईल. मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणीसुद्धा करण्यात येणार आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, १० जूनला होणार मतदान