टिपू सुलतान प्रकरणी भाजपा आणि मविआ आमने-सामने; सचिन सावंत म्हणतात…

शिवरायांच्या भूमीवर टिपू सुलतानचे काय काम? असे म्हणता मग मुंबईच्या रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या भाजपाने प्रस्ताव का दिला होता? अकोला पालिका सभागृहाला का नाव दिले? हा दुटप्पीपणा जनता ओळखते.

Congress spokesperson Sachin Sawant

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीला अनेक धक्के दिले जात आहे. नुकताच शिंदे-फडणवीस सरकारने मविआला धक्का दिला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेले टिपू सुलतानचे नाव बदलले. याबाबत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (BJP Maha Vikas aghadi Tipu Sultan case Malad sachin sawant congress twitter)

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून भाजपावर टिपू सुलतानप्रकरणी हल्लाबोल केला आहे. “शिवरायांच्या भूमीवर टिपू सुलतानचे काय काम? असे म्हणता मग मुंबईच्या रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या भाजपाने प्रस्ताव का दिला होता? अकोला पालिका सभागृहाला का नाव दिले? हा दुटप्पीपणा जनता ओळखते. उगीच गोपाळ शेट्टी व भातखळकर सहित भाजपाने आंदोलनाची धमकी देऊन पळ काढला नव्हता”, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा

“अखेर आंदोलन यशस्वी…गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टीजी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले”, असे मंगल प्रभात लोढा यांनी ट्वीट करत सांगितले.

नेमक प्रकरण काय?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना मालाडमधील उद्यानाला टिपूसुलतानचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी टिपूसुलतानचे नाव दिल्याने भाजपाने आक्षेप घेत आंदोलन केले होते. तसेच शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते.


हेही वाचा – मालाडमधील ‘त्या’ उद्यानाचे नाव बदलले, शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दे धक्का