माझं काय चुकलं? पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी पहाटेच्या सुमारास माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शपथ दिली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी पहाटेच्या सुमारास माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शपथ दिली. त्या शपथविधीवरून आजही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. मात्र याच पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मौन सोडले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीवर आपली प्रतिक्रिया दिली. “मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले होते. त्यावेळी मला त्यांनी सांगितले की, आम्ही बहुमत सिद्ध करू. त्यावर मी देखील म्हटलं ठीक आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानुसार बहुमत हे राज्यपालांसमोर किंवा राष्ट्रपती यांच्यासमोर जाऊन सिद्ध केले जात नसून विधानसभेत बहुमत सिद्ध केले जाते. यातच दुसरे कोणी नव्हते. त्यामुळे मी म्हटले या शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा. यात माझे कुठे चुकले? कोणी संविधान तज्ज्ञ असेल त्याने सांगावे”, अशी प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

”जेव्हा त्यांच्याच पक्षाचा एक प्रमुख नेता माझ्याकडे येऊन याबद्दल बोलतो. तेव्हा मला असे वाटते यानंतर त्यांना बोलण्याचा कोणताच अधिकार राहत नाही. तुम्ही मला सांगत आहात ती व्यक्ती जर इतकी महत्वाची नसती मग त्यांनी त्या व्यक्तीला इतके महत्व का दिले? त्याला उपमुख्यमंत्री का बनवले?”, असेही यावेळी भगतसिंह कोश्यारी म्हणाले.


हेही वाचा – शरद पवारांसह देशातील ‘या’ दोन मोदी विरोधकांचा उद्धव ठाकरेंना फोन