माझ्याविषयी कुणीही अफवा उठवू नका. मला जेव्हा आयुष्यातही काहीही निर्णय असेल, असा निर्णय आयुष्यात घेण्याची वेळ कधीहील येऊ नये. कारण जसं एक विवाहबंधन असोत असं संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण नकळत एकमेकांना वचन, आणाभाका, शपथा दिलेल्या असतात. आपण एका विचारधारेवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही व्यक्तीला घ्यावा लागेल तर तो निर्णय खूप त्रासदायक असतो, असं भाजप नेते पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. (BJP Maharashtra politics Time to decide Pankaja Munde Made a big statement)
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्यासाठी तो निर्णय प्रचंड त्रासदायक असेल. कारण, मी या संघटनेत माझ्या वडिलांना बघितलेलं आहे. माझ्यासाठी ती एक वेग अटेचमेंट आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेण्याची वेळ कोणावर येऊच नये, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी म्हटलेलं आहे, पंकजा मुंडे निर्णय घेईल तर ती स्वत: तुम्हाला बोलवून सांगेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अमित शहांची वेळ मिळाली नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शहा यांची वेळ मिळालेली नाही. शहा व्यग्र असल्यानं ही वेळ मिळाली नाही. सध्या निवडणुका आहेत. पण ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी भेटेन. माझ्या मनातलं मी सांगणार नाही परंतु माझ्यासोबत जी लोकं आहेत त्यांच्या अस्वस्थतेबद्दल मी बोलणार नाही. परंतु हे सर्व मी सध्याची राजकीय गणिते बसण्याची आधी बोलले होते. आता तर आणखी राजकीय चित्र बदललं आहे. सत्तेत अजून एक पार्टनर निर्माण झाला आहे. तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
(हेही वाचा: “परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला )
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरूवात केली. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली.