Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवारांसारखा माढ्यातून माघार घेण्याचा प्रकार मी केला नाही, मी लढलो - चंद्रकांत...

पवारांसारखा माढ्यातून माघार घेण्याचा प्रकार मी केला नाही, मी लढलो – चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

शरद पवारांवर कमी बोलायचे ठरवले आहे. शरद पवारांनाच माझ्या प्रत्येक वक्तव्यावर बोलावस वाटत आहे. पवारांना बारामतीमधून लढणार हे सांगून माघार घ्यावी लागली. कारण त्यांना माहित होत की आता ते माढ्यातून जिंकणार नाहीत. म्हणूनच ते माढ्यातून लढले नाहीत. पवारांनी माढ्यातूनही माघार घेतली, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यशक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या टोल्याला प्रतिउत्तर दिले आहेत. मला पक्षाने जे सांगितले ते मी केले, मी पक्षाची शिस्त पाळली असे ते म्हणाले. माढ्यातून माघार घेण्याचा प्रकार मी केला नाही, पक्षाने जिथे सांगितले तिथे मी लढलो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ज्यांना आपलं स्वतःच गाव सोडून राहण्यासाठी दुसऱ्या गावी जाव लागत अशा लोकांबद्दल मी बोलायच का असा सवाल शरद पवार यांनी केला होता. त्यावरच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रसारमाध्यमांशी सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJp maharashtra president chandrakant patil raised quetion on sharad pawar decision to not contest election from madha constituency)

खुद्द शरद पवार यांनी आपला पत्ता आता बारामतीमधून मुंबई असा केला आहे. मतदान ओळखपत्रावरही तशीच नोंद आहे, या गोष्टीकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले. मला पक्षाने ज्याठिकाणाहून निवडणूक लढवण्याची संधी दिली, त्याठिकाणाहून मी निवडणूक लढवली असे सांगत मी पक्षाची शिस्त पाळली असे चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले. मी केवळ पूजा चव्हाण प्रकरणात शरद पवार यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. पण पवार साहेब माझ्या बोललेल्या प्रत्येक विधानाचा इतका गांभीर्याने विचार करत असतील असे वाटले नव्हते असे ते म्हणाले. शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षनेते सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून जाव लागत. चंद्रकात पाटील आपल्या गावातून जरी दुसऱ्या गावात आले असले तरीदेखील ते निवडून आले. ते राज्याचे नेते आहेत. त्यामुळे आमचे राज्याचे नेते कुठुनही निवडून येऊ शकतात हे महत्वाचे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. शरद पवार गप्प का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर ज्यांना आपलं स्वतःच गाव सोडून राहण्यासाठी दुसऱ्या गावी जाव लागत अशा लोकांबद्दल मी बोलायच का ? असा टोला शरद पवारांनी लगावला. पुण्यात खयाल यज्ञ कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


हे ही वाचा – कधी ना कधी गाव सोडून जावच लागत, शरद पवारांच्या टोल्यावर आलं भाजपच उत्तर


- Advertisement -

 

- Advertisement -