घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांची फसवणूक, ३ महिन्यांपासून सेवेत असलेल्या वास्तूचं उद्घाटन - आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांची फसवणूक, ३ महिन्यांपासून सेवेत असलेल्या वास्तूचं उद्घाटन – आशिष शेलार

Subscribe

मुख्यमंत्र्यांची फसगत करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच महापालिकेच्या सत्ताधीशांची कानउघडणी केली पाहिजे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यालयाचा वापर गेल्या ३ महिन्यांपासून प्रशासकीय कामांसाठी करण्यात येत असल्याचा खुलासा वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. यामुळे श्रेय घेण्यासाठी हे उद्घाटन करण्यात आलं का असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची फसगत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे. केवळ श्रेयासाठी महापालिकेतील सत्ताधारी वायफळ प्रयत्न करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप आमदार आशिष शेलार नियोजित दौऱ्यावर असल्यामुळे या महानगरपालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनाला उपस्थिती राहू शकले नाही. मात्र एक व्हिडिओ ट्विट करत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची फसगत करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पण हे कार्यालय वापरामध्ये ३ महिन्यांपुर्वीच आले आहे. जे कार्यरत सेवेत कार्यालय आहे. त्या कार्लायलाचं कार्यक्रमाच उद्घाटन करुन सेवेत कार्यरत करण्याचे कारण काय आणि त्याच्या मागचा अट्टहास काय आणि मग विषय अट्टहासाचा आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये बसलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत असा माझा अट्टहास असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा या कामात काही संबंध नाही

मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला सर्व माहिती सर्व योग्य सूचना आणि सगळ्याची योग्य माहिती देणं आवश्याक आहे. जे कार्यालय ३ महिन्यांपुर्वी सुरु झालं आहे केवळ श्रेयवादासाठी करुन दाखवलंय हे धाखवण्यासाठीचा वायफळ प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी करत आहेत. आणि जर विषय श्रेयाचा असेल तर हे सांगण आवश्यक आहे की, हे कार्यालय उभं करण्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. गेली ६ वर्ष या बाबतचा सातत्याने प्रयत्न वांद्रे पश्चिम विभागातील नागरी संस्था स्थानिक संस्था, एएलएम, नागरिकांच्या पाठपुराव्याने हे काम झाले असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटल आहे.

- Advertisement -

तसेच आमदार म्हणून मी सतत केलेल्या प्रयत्नांचा परिणाम यामुळे हे नवीन कार्यालय उभं राहिलेलं आहे. गेल्या ६ वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तत्कालीन महापौर, आयुक्त यांच्या मदतीने ८ वेळा बैठक घेऊन त्याच्या प्रस्ताव मांडला त्याचे नियोजन केलं आहे. त्याचे टेंडर निघाले आणि त्यानंतर उभं राहिलेलं हे कार्यालय लोकांसाठी सुरु झालं केवळ श्रेयासाठी अशी धावपळ करुन मुख्यमंत्र्यांची फसगत करणं हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांची फसगत करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच महापालिकेच्या सत्ताधीशांची कानउघडणी केली पाहिजे अशी माजी विनंती असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -