Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लस खरेदीसाठी ठेवलेला एकरकमी चेक विद्यार्थ्याच्या फीसाठी वापरा, भाजपची मागणी

लस खरेदीसाठी ठेवलेला एकरकमी चेक विद्यार्थ्याच्या फीसाठी वापरा, भाजपची मागणी

'तो'चेक आता कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी वापरावा

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांना दिली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घोषणा करत आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता केंद्र सरकार देशातील सर्वच नागरिकांचे लसीकरण करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी घेत एकरकमी चेक तयार असल्याचे सांगिगतले आहे. यामुळे तो चेक विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील ६ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधीची तरतूद केली होती. लस खरेदी करण्यासाठी एकरकमी चेक तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात आले आहे. परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एकरकमी लसी घेणं जमले नाही. यामध्ये आता केंद्र सरकारने राज्यसह देशातील सर्वच नागरिकांचे लसीकरणाची जबाबदारी घेतल्यामुळे आता राज्य सरकारला लस खरेदी करावी लागणार नाही आहे. यामुळे राज्य सरकारच्या एकरकमी चेकने राज्यातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मोफत लस देण्यासाठीचा ६५०० कोटींचा ‘तो’चेक आता कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी वापरावा अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

भातखळकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे घोषित केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं की १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा चेक तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री लसीकरण करु शकणार आहेत. परंतु चेक तयार आहो तो आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी वापरा, राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्या पैसे नाहीत हे आता सांगता येणार नाही. केंद्र सरकारने तुमचे पैसे वाचवले आहेत त्यामुळे ते आता विद्यार्थ्यांनाच्या फी माफीसाठी वापरा जर राज्य सरकारने असे केले नाही तर भाजप आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -