घरताज्या घडामोडीटक्केवारीवाल्यांची काळजी घेण्यास पालिका समर्थच, भातखळकरांचा यशवंत जाधवांना टोला

टक्केवारीवाल्यांची काळजी घेण्यास पालिका समर्थच, भातखळकरांचा यशवंत जाधवांना टोला

Subscribe

रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्यांना म्हणतात

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या संकटाशी समाना करता करता पुन्हा एकदा पावसाळा तोंडावर आला आहे. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा आला असून पावसाळापुर्वी पालिकेचे काम अजून पुर्ण झालेली नाहीत. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर यशवंत जाधव यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भातखळकरांनी पालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना. पालिका समर्थच आहे असे भातखळकरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत पावसाळा तोंडावर आलेला असताना महापालिकेकडून सध्या नाल्यांच्या सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झालेले असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम ८ टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला असल्याचे म्हणत पालिकेवर हल्लाबोल केला होता. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ट्विट करत म्हटले की अतुल भातखळकर तुम्ही अजिबात चिंता करु नका. सर्व कामे पूर्ण होतील. पालिका समर्थ आहे. जमल्यास तुम्ही आणि तुमच्यासारखे तुमच्यातलेच रिकामटेकडे यांनी श्रमदान करुन एक तरी छोटा नाला साफ करा. कोरोनाच्या काळात तेवढेच पुण्य खात्यावर जमा होईल असा टोला यशवंत जाधव यांनी भातखळकरांना लगावला आहे.

रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्यांना म्हणतात

यशवंत जाधव यांच्या प्रतिक्रियेवर भातखळकर यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना. पालिका समर्थच आहे, पण सत्ताधारी मात्र निक्कमे आहेत. दर पावसाळ्यात हे दिसतेच.जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातली घाणसुद्धा साफ करण्याचे काम करीतच आहोत असे वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केले आहे. भातखळकर यांनी दिलेल्या उत्तरानंतर स्थायी समिती अध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -