Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने ‘कोरोनामुक्त गाव’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.  ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. याशिवाय त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाण साधला. तसंच स्पर्धेचं आयोजन करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याना देखील लक्ष्य केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील अनेक करती माणसं मरण पावली आहेत. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय,” असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला. तसंच सगळं गाव करणार मग राज्य सरकार काय करणार? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा

- Advertisement -

राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात हेत असताना ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा आयोजित केली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -