Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप; यशोमती ठाकूर यांच्यासमोरच केली...

भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप; यशोमती ठाकूर यांच्यासमोरच केली खंत व्यक्त

Related Story

- Advertisement -

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याची खंत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच मंदा म्हात्रे यांनी २०१९च्या निवडणुकीत अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते. त्याचप्रमाणे २०१९च्या निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नक्की काय म्हणाल्या मंदा म्हात्रे? 

एका कार्यक्रमात मंदा म्हात्रे म्हणाल्या की, ‘आपल्याच घरातील माणसं म्हणजेच आपल्याच पक्षातील माणसं एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की, त्यांना भीती निर्माण होते. मग ती भीती निर्माण झाली की फोटो टाकायचे नाहीत, कार्यक्रमाला बोलवायचं नाही. लक्षात घ्या भगिनींनो जेव्हा तुमचे फोटो टाकले जात नाहीत किंवा बोलावलं जात नाही तेव्हा समाजायचं तुमचं कार्य चांगलं असून त्यांना यामुळे धडकी भरली आहे. म्हणून कुठलंही काम करत राहायचं आणि फळाची अपेक्षा बघायची नाही. झाडं लावतो ना मग पाच-सहा वर्षाने त्यांचं फळं मिळतं. आज ३० वर्ष राजकारणात वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. संघर्ष करताना एखादी महिला चांगली काम करत असेल. मग ते शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अधिकारी असेल. कुठलंही चांगलं काम केलं, तिला पुरस्कार मिळाला की उद्यापासून तुमच्यामागे कशी कात्री लावायची ते या शाळेत शिकायचं.’

‘पण माध्यमांना हाताशी घ्यायचं आणि महिलांची कामं…’

- Advertisement -

पुढे त्या म्हणाल्या की, ‘पहिल्यांदा मी दीड हजार मतांनी निवडून आले. तेव्हा लोकं म्हणाले, मोदीमुळे अपघाताने निवडून आले. १३ दिवसांच्या अगोदर मला तिकिट मिळाली. हे का सांगतेय, कारण तुम्ही सगळ्या कर्तुवान महिला आहात. तुम्हाला कळलं पाहिजे, कसा कसा संघर्ष महिलांना करावा लागतो. यावेळी निवडून आले तेव्हा मोदींची गाठं नव्हती. माझं काम होतं, माझं कर्तुव होतं. पण माध्यमांना हाताशी घ्यायचं, महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं. त्यांच्या बातम्या येऊन द्यायच्या नाहीत.’ मग यशोमती ठाकूर यांच्या बघून बोलल्या की, ‘तुम्हाला याचा अनुभव आहे, पण माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणार. कारण ग्रामीण भाग आहे, शहर भागाच तर एवढं आहे. तर ग्रामीण भागात किती असेल.’

‘मी कोणालाच घाबरत नाही’

‘मी कोणालाच घाबरत नाही. माझा हात दगडाखाली नाही आहे ना, मग मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी स्पष्ट बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. २०१९ ला पक्षाला सांगू टाकलं आणि मी लढली असती तर एवढीचं मत मी जिंकली असती. कारण इतर पक्ष असतात आपल्याला साथ द्यायला. म्हणून आपण कधी आपल्याला कमी समजू नये,’ अशा मंदा म्हात्रे म्हणाल्या.


- Advertisement -

हेही वाचा – जावेद अख्तर यांनी तालिबान्यांसोबत केली RSSची तुलना, म्हणाले…


- Advertisement -