“उद्धवजी उभे असते तर हवेने उडून गेले असते”; नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांना टोला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलनात सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'बाबरी पाडली तेव्हा तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती', असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

mla nitesh rane personal assistant rakesh parab surrenders kankavli police

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलनात सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘बाबरी पाडली तेव्हा तुम्ही खरच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती’, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता विरोधी पक्ष भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “तुमच्या मुलाला म्याऊ म्याऊ म्हटलं की तुम्हाला राग येतो, मग दुसऱ्याच्या वजनांबद्दल आणि आवाजाबद्दल तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार”, असं नितेश यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंनी वजनावरून फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटले की, “तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलता, उद्धवजी उभे असते तर हवेने उडून गेले असते आणि दुसरीकडे कुठे जाऊन पडले असते, असे आम्ही म्हटले तर चालेल का? जर तुम्हाला तुमच्याबद्दल बोललेले आवडत नसेल. तरी तुम्ही असे बोलणे थांबवा. नाहीतर सहन करण्याची ताकद ठेवा.”, असंही त्यांनी म्हटलं.

“उद्धव ठाकरेंना हिंदुत्त्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची सभा पाहिल्यानंतर जे औषधे सध्या ते घेत आहेत. त्यांचा परिणाम त्यांच्यावर होत असल्याचे जाणवले. त्यांच्या डॉक्टरांना माझी विनंती आहे त्यांनी आपल्या पेशेंन्टकडे जरा लक्ष द्यावे. अवेळी बोलणे, विषयाच्या आजूबाजू पण न राहणे आणि बडबडत राहणे, असा आजार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लागला असून त्यांची मला चिंता आहे”, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

“शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना सैनिकांची अक्कल घुडक्यात असते. ते मला खरे वाटते. काल त्यांच्या पक्ष प्रमुखांनी ज्वलंत उदाहरण आम्हाला दाखवून दिले.”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

“तुम्ही वाघनखे दाखवा, बोटे छाटा पण तुम्ही फक्त पोलिसांना बाजूला करा मग कुणाचे किती बोटे राहतात आपण बघून घेऊ. राज्यात इतके मुद्दे असताना त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत अन् हिंदुत्वावर बोलताय, तुमच्या बुडाखालचा अंधार बघा. आपले अपयश झाकण्यासाठी तुम्ही केंद्रावर टीका करता पण केंद्रामुळे तुम्हाला काही सुविधा मिळता त्यावर का बोलत नाहीत”, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.


हेही वाचा – लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, राणा दाम्पत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र