घरताज्या घडामोडीहनुमानाच्या नावाने शिवीगाळ; शिवसेना नेते अब्दुल सत्तारांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत नितेश...

हनुमानाच्या नावाने शिवीगाळ; शिवसेना नेते अब्दुल सत्तारांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंनी केली अटकेची मागणी

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसा पठणाच्या भूमीकेनंतर राज्यात सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून या हनुमान चालीसा पठणावरून विरोधीपक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसा पठणाच्या भूमीकेनंतर राज्यात सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून या हनुमान चालीसा पठणावरून विरोधीपक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता या वादात भाजपा नेते नितीश राणे यांनी उडी मारली आहे. नितीश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा 2017 मधील वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ केला आहे. तसंच, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भगवान हनुमानाचे नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करताना दिसत आहेत. नितेश राणेंनी या व्हिडिओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून, सत्तारांच्या अटकेची मागणी केली आहे.

- Advertisement -

नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर ‘शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करताना. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना…मग सत्तारांना तुरुंगात डांबून दाखवा,’ असे आव्हान केले आहे. यावर अद्याप अब्दुल सत्तारांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपकडून अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -