घरमहाराष्ट्रBJP MLA Nitesh Rane: वफ्फ बोर्डाची जमीन सर्वाधिक; हिंदू जनआक्रोश मोर्चात राणेंचा...

BJP MLA Nitesh Rane: वफ्फ बोर्डाची जमीन सर्वाधिक; हिंदू जनआक्रोश मोर्चात राणेंचा दावा

Subscribe

मुस्लिमांना मालमत्तेविषयी अमर्याद अधिकार देणाऱ्या वक्फ बोर्डावर नीतेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.

सोलापूर: मुस्लिमांना मालमत्तेविषयी अमर्याद अधिकार देणाऱ्या वक्फ बोर्डावर नीतेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. सोलापुरात काल हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये भाजपाचे आमदार नीतेश राणे आणि तेलंगणातील भाजपा आमदार टी.राजा. सिंह यांना आमंत्रित करण्यात आले होते. (BJP MLA Nitesh Rane Waff Board land not army Nitesh Rane s claim in the Hindu Janakrosh Morcha pup)

यादरम्यान नीतेश राणे म्हणाले की, वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे. सैन्य आणि रेल्वेकडे जेवढी जमीन नाही, तेवढी या बोर्डाकडे आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही.

- Advertisement -

काय म्हणाले नितेश राणे? 

नितेश राणे म्हणाले की, हिंदू बांधव आपल्याच भूमित परका होतो आहे. सन 20147 पर्यंत या देशाचे इस्लामीकरण करण्याचा काही देशविघातक शक्तींचा डाव आहे. लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहादसारख्या मोहिमा देशात आक्रमकपणे चालवून हिंदूंना लक्ष्य केलं जात आहे. देशात रेल्वे आणि संरक्षण दलाची मिळून जितकी जमीन नाही तितकी जमीन एकट्या वफ्फ बोर्डाकडे आहे, असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. हिंदूंची मालकी असणाऱ्या जमिनीवर वक्फच्या आडून दावा केला गेला तर तुम्ही कडवटपणे विरोध करायला शिका. राज्य अन् केंद्र सरकार तुमच्या पाठीशी राहील, असा विश्वासही राणे यांनी निदर्शकांना दिला.

सकल हिंदू समाजाचा मोर्चा

वक्फ कायदा-1995 रद्द करण्यात यावा. केंद्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावरच जाहीर सभा घेण्यात आली, यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर सुरेश चव्हाण, काजल हिंदुस्थानी, भारतानंद सरस्वती उपस्थित होते.

- Advertisement -

(हेही वाचा: Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -