घरताज्या घडामोडी'करारा जवाब मिलेगा' राणेंना जामीनानंतरचे नितेशचे ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

‘करारा जवाब मिलेगा’ राणेंना जामीनानंतरचे नितेशचे ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर नारायण राणे अटक नाट्य आणि आरोप प्रत्यारोप सुरू होते. शेवटी मंगळवारी रात्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून दिलासा मिळाला. तासभर झालेल्या सुनावणीनंतर राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले. अखेर सत्याचाच विजय झाला अशा आशयाचे ट्वीट नारायण राणेंकडून करण्यात आले. तसेच भाजप आमदार आणि राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी देखील जामीन मिळताच ट्वीट करून शिवसेनेला इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी मनोज वाजपेयीच्या एक चित्रपटातील व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला त्यांनी इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी म्हणतोय की, ‘मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी. करारा जवाब मिलेगा. करारा जवाब मिलेगा.’ या ट्वीटमुळे नितेश राणे आता चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, नारायण राणे हे संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्या ठिकाणी ते दुपारचे जेवण करत असताना पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली. ‘साहेबांना हात लावायचा नाही. अरेस्ट वॉरंट दाखवा. साहेब जेवत आहेत’, असे राणेंचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, निलेश राणे यांचा आवाज वाढताच स्वत: नारायण राणे जेवणाच्या भरलेल्या ताटावरून उठले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता हे राजकीय नाट्य किती दिवस चालेल हे काही सांगत येत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पोलिसांना शिवीगाळ करणे वरुण सरदेसाईंना भोवणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -