भाजपा आमदार नितेश राणेंचे दीपक केसरकरांना उत्तर, म्हणाले…

शिंदे गाटचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत राणे पिता पुत्रांवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला भाजपा आमदार नितेश राणें यांनी दिले.

Nitesh Rane

शिंदे गाटचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत राणे पिता पुत्रांवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केला होता. या यानंतर आज नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दीपक केसरक यांच्या आरोपांना उत्तर दिले.

नितेश राणेंचे दीपक केसरकरांच्या आरोपांना उत्तर –

यावेळी त्यांनी  महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. हिंदुत्ववाचा विचार आजून प्रखर झाला पाहीजे. यासाठी 166 आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, येवढेच मी सांगतो, असे नितेश राणे म्हणाले.

दीपक केसरकर काय म्हणाले –

केसरकर यांनी यावेळी नारायण राणे यांच्यामुळे युती फिसकटल्याचा दावा केला आहे. नारायण राणे  यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात  आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचे  व्यासपीठ वापरून राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यासाठी राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. याबाबत मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे  दिसून आले . हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला आणि त्यानंतर दोघांची भेट झाली, असा दावा केसरकर यांनी केला होता.

पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे  यांची तयारी होती. पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने  ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले. आदित्य ठाकरेंची  बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याचे ठरवले होते, असेही त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेत युतीची बोलणी सुरु असताना विधानसभेत भाजपच्या १२  आमदाराचे  निलंबन झाले. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले, असाही दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.