‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारानंतर डिसलेंना नवी ऑफर

‘ग्लोबल टीचर’चा पुरस्कार मिळालेल्या सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अजून एक नवी ऑफर मिळाली आहे.

Ranjit Singh Disley Guruji

‘ग्लोबल टीचर’चा पुरस्कार मिळालेल्या सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अजून एक नवी ऑफर मिळाली आहे. ही ऑफर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली असून डिसलेंच्या आमदारकीची दरेकर यांनी स्वत: शिफारस केली आहे. दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यासोबत बोलणे देखील करु दिले आहे. त्यामुळे डिसलेंना आणखीन एक संधी मिळणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

आमदारकीची देणार संधी

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षक रणजितसिंह डिसले यांची आज प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्यासहकुटुंबाचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

डिसले-फडणवीसांशी फोनवरुन चर्चा

दरम्यान, दरेकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे देखील करुन दिले. यावेळी फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आपण भेटू, असा शब्द देखील फडणवीस यांनी डिसलेंना दिला.

काय म्हणाले दरेकर?

‘शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो. ज्याच्यासाठी जो मतदारसंघ आहे, तो नसतो. मग साहित्यिक असो प्राध्यापक असो. यांच्यासाठी हे मतदारसंघ आहेत. परंतु, तुम्ही बघत असाल कशाप्रकारे निवडणुका होत आहेत. त्यावर वेगळे काही बोलण्याची गजर नाही. त्यामुळे आम्ही निश्चितपणे शिफारस करु’, असे स्पष्ट मत दरेकरांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे.


हेही वाचा – ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेले सोलापूरचे डिसले पहिले भारतीय