घरताज्या घडामोडीपवारांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत?,...

पवारांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत?, राम कदमांचा खोचक सवाल

Subscribe

शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीचा आढावा घेतला तसेच संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आवाहन शरद पवारांनी केलं आहे. या बैठकीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांना मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तर त्यांना मुख्यमंत्री स्वतःचा चार्ज का देत नाही असा खोचक सवाल करत राम कदम यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केलं आहे. मात्र शरद पवार यांनी बैठक कशी घेतली असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.

भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि एसटी प्रवाशांना सेवा द्यावी असे आवाहन पवारांनी केलं आहे. शरद पवारांनी एसटीच्या अधिकाऱ्यांची आणि परिवहन मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी कर्मचारी आणि कृती समितीमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांनी घेतलेल्या बैठकीवर आता भाजपकडून घणाघात करण्यात आला आहे.

- Advertisement -

आमदार राम कदम यांनी ट्विट करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या बैठकीवर हल्लाबोल केला आहे. राम कदम म्हणाले की, शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा आहे की डॉ बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियमांचे तरी पालन करा, स्वतः च्या मनमर्जी प्रमाणे संविधान आणी घटनेचा ह्या सरकारला अपमान करता येणार नाही असे राम कदम यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ST Worker Strike : पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा, पडळकरांचा अनिल परबांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -