आमच्याकडे १६६ एवढं बहुमत, विरोधी पक्ष अल्पमतात; आमचाच विजय – राम कदम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. उद्या विधीमंडळाचं अधिवेशन असून विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरला आहे. त्यांची अध्यक्षपदाची बैठक व्यवस्थितपणे पार पडेल आणि आम्हीच ही निवडणूक जिंकू. आमच्याकडे १६६ एवढं बहुमत आहे आणि विरोधी पक्ष अल्पमतात आहेत. त्यामुळे आमच्याच उमेदवाराचा विजय होईल, असं भाजपचे आमदार राम कदम म्हणाले.

आमच्याकडे १६६ एवढं बहुमत, विरोधी पक्ष अल्पमतात

शिंदे-भाजपची संयुक्ती बैठक पार पडल्यानंतर राम कदम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,  कामकाजामध्ये पहिलं कामकाज हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज आहे. जेव्हा अध्यक्षपदाची निवड पार पडते आणि आमदार जिंकतात. यावेळी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे. ते जिंकल्यानंतर दुसरा प्रस्ताव येण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे १६६ एवढं बहुमत आहे आणि विरोधी पक्ष अल्पमतात आहेत. त्यामुळे आमच्याच उमेदवाराचा विजय होईल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं डबल इंजिनचं सरकार

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं डबल इंजिनचं सरकार येथे आहे. कोणीही काहीही बोलू काहीही बिघडणार नाही. शिवसेनेच्या निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्याच्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा सन्मान करू असं सांगितलं आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.तर विजय आमचाच होणार, अशी प्रतिक्रिया देखील आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.


हेही वाचा : शिंदे गट आणि भाजप आमदारांची ताजमध्ये बैठक सुरु