घरताज्या घडामोडी...तर आम्ही पावणेपाच नावं ED, CBIला देणार, रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

…तर आम्ही पावणेपाच नावं ED, CBIला देणार, रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन ईडीसंबंधित गौप्यस्फोट करणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थितीत राहणार आहे. दरम्यान अनिल देशमुखांच्या कोठडीत भाजपचे साडेतीन लोकं असतील आणि अनिल देशमुख जेल बाहेर असतील असे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. हे साडेतीन लोकं कोण असतील? याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. पण त्यापूर्वी आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की, ‘जर संजय राऊत साडेतीन नावाचा गौप्यस्फोट करणार, तर आम्ही पावणेपाच नाव ईडी आणि सीबीआयला देणार आहे.’

रवी राणा नेमके काय म्हणाले?

‘संजय राऊत साडेतीन जणांना अनिल देशमुखांच्या कोठडीत पाठवण्याबाबत बोलतात. तसेच राऊत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईपासून नागपूरमध्ये जाऊ देणार नाही सांगतात. मुंबईमध्ये बसून देवेंद्र फडवणीसांना दम देत असतात, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्याप्रमाणे साडेतीन जण संजय राऊत सांगतात, तर आमच्याकडे पावणेपाच जणांनी नावे आहेत. ते आम्ही एका बंद लिफाफ्यामध्ये ईडी आणि सीबीआयला देणार आहोत,’ असे आमदार रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा वादावर काय म्हणाले रवी राणा?

रवी राणा म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे हयात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगीची गरज नव्हती. पुतळ्यावरून बोट दाखवणाऱ्यांचे बाळासाहेबांनी बोट छाटले असते. उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती विसरले आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अमरावतीमध्ये बसू देत नाहीत. तसेच शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. त्यांना आरोपींसारखी वागणूक दिली जात आहे. आता शिवसेना काँग्रेससेना झाली आहे. याप्रकरणी मी मानवाधिकार आणि लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे.’


हेही वाचा – आताच काय ती पब्लिसिटी घ्या, तीन वाजल्यानंतर राऊतांचे सिक्सर असतील – सुप्रिया सुळे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -