नवी दिल्ली – मंत्रीपदापासून वंचित राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची तत्काळ प्रभावाने महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आजपासूनच ते महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नियुक्त झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले होते, तेव्हापासून पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार अशी चर्चा होती, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
रवींद्र चव्हाणांसमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे आव्हान
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी ही महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील पुणे, नागपूरसह अनेक शहरांच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्ठाच्या निवडणुका आहेत. विधानसभेतील यशाचा कित्ता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही गिरवण्याचे आव्हान चव्हाणांसमोर असणार आहे.
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः – रवींद्र चव्हाण
“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा पक्षाचा मंत्र मनात ठेवून काम करत असल्याचे सांगत रवींद्र चव्हाण यांनी पक्षाने दिलेलेल्या नवीन जबाबदारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्य७ चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मीडियावर रवींद्र चव्हाण यांनी पोस्ट करत पक्षाने दिलेल्या नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः”
आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय… pic.twitter.com/Q8Xy5ZAzZe
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 11, 2025
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसुलमंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यामुळे संघटनेतील जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. 2019 विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. भारतीय जनता पक्षात तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली जाते.
हेही वाचा : Suresh Dhas : भरसभेत सुरेश धसांनी टाकला बॉम्ब; गुजरात ड्रग्ज तस्करांसोबत धनंजय मुंडेंचे फोटो