घरमहाराष्ट्रसावरकरांबाबतच्या विधानावरून वाद विकोपाला; राहुल गांधींविरोधात मुंबईसह अनेक ठिकाणी आंदोलन

सावरकरांबाबतच्या विधानावरून वाद विकोपाला; राहुल गांधींविरोधात मुंबईसह अनेक ठिकाणी आंदोलन

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भाजप, मनसे आणि काँग्रेसविरोधात पक्षांकडून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि मनसे कार्यकर्ते कार्यकर्ते झाले आहेत. (bjp mns agitation against rahul gandhi in thane mumbai budhana nashik on veer Savarkar row)

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांविरोधात वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे त्याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दाखवली. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची शेगावमधील सभा उधळवण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मनसे नेते अविनाश जाधव, नितीन सरदेसाई सहभागी झाले आहेत. चिखलीमध्ये 200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांनी आक्रमक मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. मात्र पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा मनसैनिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत त्यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेने जोरदार आंदोलन सुरु केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात ते गेले, त्यांनी इंग्रजांसोबत मिळून काम केले, ते तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा खरे सावरकर समोर आले. त्यांनी इंग्रजांना पत्रे लिहिली. त्यांच्यासोबत हात जोडले. इंग्रजांसोबत काम करायला तयार असल्याचे सांगितले म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. काल अकोला जिल्ह्यातल्या चान्नी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. या माफीनाम्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली.

दहिसर विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. दरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. काल सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवलीय.


पुण्यात धावत्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक; एक गंभीर जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -