घरमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

Subscribe

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात गावित यांच्यासह कारमध्ये असलेले त्यांचे काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहे. गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारी नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातावेळी गावित यांची कार एका झाडाला जाऊन आदळली.

दरम्यान जखमी महिलेला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर खासदार हिना गावित यांना देखील नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जातेय. टीव्ही 9 या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

- Advertisement -

खासदार हिना गावित आपल्या कार्यकर्त्यांसह कारने एका खाजगी पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी हा अपघात झाला आहे. दरम्यान गावित यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण पुढील उपचारांसाठी रेल्वेने त्या उपचारांसाठी मुंबईत दाखल होणार आहेत.

या अपघातावेळी गावित यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुभाष पाटील, महेंद्र पटेल, जीतू पाटील, प्रतिक जैन हे कारमध्ये उपस्थित होते. यातील सुभाष पाटील यांना पायाला तर महेंद्र पटेल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर जीतू पाटील, प्रतिक जैन हे किरकोळ जखमी झाले आहेत.

- Advertisement -

तसेच त्यांच्या गाडीला धडकलेल्या दुचाकीवरील महिला आणि पुरुष यांनाही दुखापत झाली, सध्या त्यांच्या उपचार सुरु असून दोघांची प्रकृती स्थिती आहे.


हेही वाचा : राज्यातील ‘या’ भागांत पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -