घरमहाराष्ट्रGirish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार 'अशी' राहिली...

Girish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार ‘अशी’ राहिली गिरीश बापटांची चार दशकांची कारकिर्द

Subscribe

भाजप खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपाचारादरम्यान, त्यांचा मृत्य़ू झाला. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1995 पासून 2019 पर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गिरीश बापट यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे एक जाळ उभारले होते. जात-धर्म इतकेच काय तर पक्ष विरहित मतदार हे गिरीश बापट यांच्या पाठीमागे गेली 25 वर्षे उभे होते.

- Advertisement -

राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविद जबाबदा-या पार पडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे.

कामगार नेता

पुण्याच्या राजकारणात भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यासांठी अनेकदा लढा दिला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास )

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

आणीबाणीच्या काळात तुरंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली आणि पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळी निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काॅंग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काॅंग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -