घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा उद्रेक; नारायण राणेंची टीका

मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा उद्रेक; नारायण राणेंची टीका

Subscribe

राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पेलवत नाही.

कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाऊनवरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सरकारमधील इतर दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी उतावळे नाही आहेत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतावळे आहेत. मुख्यमंत्री माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलायचं सोडून देतील. कारण त्यांच्या कुटुंबातील सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यांचं धोरण चुकीचं आहे, म्हणून कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पेलवत नाही आहे. कोरोना वाढतोय आणि मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्यासाठी उतावळे आहेत पण बाकीचे दोन मित्र उतावळे नाहीत. जेव्हा कोरोना आला तेव्हा माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली होती. यांना स्वतःची जबाबदारी पेलवली नाही. बेडची दुरावस्था झालेली आहे. अन्य राज्यात कोरोना नाही मग आपल्या इथे का वाढतोय? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

- Advertisement -

महाराष्ट्राची रुग्ण संख्या का वाढतेय? महाराष्ट्रात लॉकडाऊन केला तर नागरिकांनी करायचं काय? शिस्त पाळा नाही तर लॉकडाऊन करु अशा धमक्या देतात. लॉकडाऊनच्या धमक्या मतदारांना देतायत यांना काय अधिकार आहे? असा सवाल राणेंनी केला. कोरोनामुळे या सरकारचं नाक कापलं आहे. मी मातोश्रीत बसतो तुम्ही घरी बसा. यांना जेवायला मिळेल, पण नागरिकांना कोण देणार? अशी टीका करत राणेंनी सवाल केला आहे.

लॉकडाऊनला आमचा आणि पक्षाचा विरोध आहे. लॉकडाऊन राज्याला परवडणारं नाही. लोकं गावाला गेली तर तेच, इथं राहिली तरी तेच. हे सरकार फसवाफसवीचे काम करत आहे, असं टीकास्त्र राणेंनी डागलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -