घरताज्या घडामोडी'राऊतांसोबत चहा पिण्याची इच्छा झाल्यानंच घरी आलो' संभाजीराजे-संजय राऊतांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

‘राऊतांसोबत चहा पिण्याची इच्छा झाल्यानंच घरी आलो’ संभाजीराजे-संजय राऊतांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Subscribe

संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. त्यापुर्वी ही भेट झाली असल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणतीही माहिती नसताना संभाजीराजे अचानक संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय नेते अवाक झाले आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे राज्यातील प्रमुख नेते आणि खासदार दिल्लीत आहेत. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भेटी होत असतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी भाजप नेते आणि खासदार संभाजीराजे छत्रपती गेले होते. राऊतांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिट चर्चा झाली. दरम्यान संजय राऊत यांच्यासोबत चहा पिण्याची इच्छा झाल्यामुळे त्यांच्या घरी भेटीला आलो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. मात्र संजय राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

भाजप नेते आणि खासदार संभाजीराजे यांच्यामध्ये राजकारणापलीकडे मैत्रीचे संबंध आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा भेटी झाल्या आहेत. परंतु संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. त्यापुर्वी ही भेट झाली असल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणतीही माहिती नसताना संभाजीराजे अचानक संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय नेते अवाक झाले आहेत.

- Advertisement -

संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत माझे जुने दोस्त आहेत. आज त्यांच्यासोबत चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या भेटीसाठी घरी आलो तसेच या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. परंतु दोन बडे राजकीय नेते भेटत असतात तेव्हा नक्कीच राजकीय चर्चा होते असे यापूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या भेटीमध्येही राजकीय चर्चा झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे. संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली परंतु संजय राऊतांनी माध्यमांसमोर मौन धारण केल्यामुळे या भेटीचे नक्की कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांना विषय कळवलाय – राजे

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंबंधित प्रतिक्रिया दिली आहे. अनेक गोष्टी अडचणीत असून ५ प्रश्न राज्य सरकार सोडवू शकते परंतु त्यांन सोडवल्या नाही आहेत. यावर मराठा संघटना निर्णय घेतील त्यांच्या निर्णयानुसार मी चालतो असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार का? असा सवाल संभाजीराजे यांना करण्यात आला होता. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली की, मुख्यमंत्र्यांची नेहमीच भेट घेत असतो. त्यांना विषयाची माहिती आहे. तसेच त्यांना विषयाबाबत कवळण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्यास संभाजीराजे यांनी नकार दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका, मनसेची लतादीदींच्या स्मारकावरुन प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -